जीवन
एक जीवन अनेक अर्थ .... त्यातूनच गाठायचा असतो परमार्थ .... आयुष्य हे बरच काही शिकवते.... बरच काही घडवते बरच काही बिघडवते बरच काही सुधरवते देखील आपण नेहमी यातून फक्त वाईट आणि वाईट च लक्षात ठेवतो.पण खरे तर तसे नसावे...आपल्या आयुष्यात आपण खूप चांगले क्षण सुद्धा घालवलेले असतात .कळत नकळत बऱ्याच गोष्टि वर मोकळेपणाने हसलेलो असतो.बऱ्याच गोष्टी मनात कुठेतरी गुंफून ठेवलेल्या असतात.. लहानपणी जस आपल मन खूप निर्मळ असते...जसजस मोठं होत जातो तस आपण सगळ्या गोष्टी मनात साठवत जातो ...बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ..पण झालेल्या गीष्टी मध्ये अडकून न पडता ..आपल्या पायावर समर्थपणे उभे राहणे यालाच जीवन ऐसे नाव........